रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांचे सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. युक्रेनसारख्या देशावर हल्लाबोल केल्याने गेल्या 20 दिवसांपासून जगभरात या नावाची चर्चा होत आहे. अशातच व्लादीमीर पुतीन यांनी त्यांच्या मृत्यूच्या भयाने एक धक्कादायक पाऊल उचलले आहे. पुतिन यांनी त्यांच्या वैयक्तिक कर्मचार्यांमधील सुमारे 1000 सदस्यांची बदली केली आहे. हे लोक त्यांना विष देतील अशी भीती पुतिन यांना वाटत असल्याने असे करण्यात आले आहे.
पुतीन यांच्या मनात नेमकी कशाची भिती?
एका वृत्तात रशियन सरकारी सूत्राचा हवाला देत असे म्हटले आहे की, सध्याचे अंगरक्षक, स्वयंपाकी, कपडे धुण्याचे काम करणारे आणि सेक्रेटरी यांना काढून टाकण्यात आले आहे, हे लोक त्यांना विष देतील अशी भीती पुतीन यांच्या मनात होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा जगभरातील देशांनी मोठ्या प्रमाणावर निषेध केला आहे. याशिवाय, पुतिन आणि रशियावर जगभरात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुतीन यांना भीती वाटत आहे की कोणीतरी त्यांना मारून टाकण्याचे प्रयत्न करेल. पुतीन यांच्या प्रत्येक हालचालींवर, विधानांवर आणि निर्णयांवर सध्या जागतिक पातळीतील देशांच्या प्रतिनीधींचे लक्ष्य लागले आहे. त्यातच, पुतीन यांनी त्यांच्या खासगी सेवेतील तब्बल 1000 जणांची बदली केली आहे.
(हेही वाचा -‘त्या’ पाकिस्तानी एजन्टसाठी ‘बेस्ट’ भंगारात काढल्या? शेलारांचा सेनेला सवाल)
कोणी केलं होतं पुतीन यांच्या हत्येचं भाष्य?
समोर आलेल्या माहितीनुसार, पुतीन यांनी 1000 पर्सनल स्टाफची हकालपट्टी केली आहे. त्यामध्ये, बॉडीगार्ड, कुक, कपडे धुणारे आणि सचिव यांचाही समावेश आहे. सध्या रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातून पुतीन यांच्यावर टीका होत आहे. तसेच, जगभरातील अनेक संस्था, कंपन्या आणि काही देशांकडून रशिया आणि पुतीन यांच्यावर निर्बंधही लादण्यात येत आहेत. अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांमधील अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये वारंवार चेतावणी दिली होती की रशिया युक्रेनच्या सामायिक सीमेवर सैन्य गोळा करत आहे. युक्रेनवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू आहे. मात्र, क्रेमलिनने हल्ले होण्याची शक्यता नाकारली. परंतु 24 फेब्रुवारीला पुतीन यांच्या आदेशावरून युक्रेनवर हल्ला करण्यात आला. त्याचवेळी, अमेरिकेचे दक्षिण कॅरोलिनाचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी पुतीन यांच्या हत्येबद्दल भाष्य केले होते. ग्राहम यांनी महिन्याच्या सुरूवातीलाच व्लादिमीर पुतीन यांची एडॉल्फ हिटलरशी तुलना केली होती. ह्या युद्धाला संपविण्याचा एकमात्र उपाय म्हणजे पुतीन यांना संपवून टाकणे, असे ग्राहम यांनी म्हटले होते.