Fearless Nadia: स्टंट करणारी पहिली भारतीय नायिका मेरी अॅन इव्हान्स म्हणजेच फिअरलेस नादिया

देश दीपक आणि नू-ए-यमन तसेच हंटरवाली, मिस फ्रंटियल मॉल, लुटारु ललना अशा काही चित्रपटातून तिने अभिनय केला आहे.

248
Fearless Nadia: स्टंट करणारी पहिली भारतीय नायिका मेरी अॅन इव्हान्स म्हणजेच फिअरलेस नादिया
Fearless Nadia: स्टंट करणारी पहिली भारतीय नायिका मेरी अॅन इव्हान्स म्हणजेच फिअरलेस नादिया

मेरी अॅन इव्हान्स उर्फ मेरी इव्हान्स वाडिया उर्फ फिअरलेस नादिया ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि स्टंट नायिका होती. नादिया ही पहिली स्टंट अभिनेत्री होती. नादियाचा जन्म ८ जानेवारी १९०८ रोजी पर्थ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे झाला. तिचे मूळ नाव मेरी अॅन इव्हान्स असे होते. मात्र ती ५ वर्षाची असताना तिच्या वडिलांची भारतात बदली झाली. पुढे ती मुंबईत राहू लागली.

‘हंटरवाली’ हा तिचा पहिला गाजलेला चित्रपट. या चित्रपटामुळे ती खूप प्रसिद्ध झाली. विशेष म्हणजे महिलांना मुख्य भूमिकेत दाखविणारा हा पहिला हा भारतीय चित्रपट होता. सुरुवातीला तिने तिने थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करु लागली आणि त्यानंतर १९३० मध्ये झारको सर्कससाठी काम करण्यास सुरुवात केली. जमशेद “जे.बी.एच.” वाडिया यांनी तिला चित्रपटात काम दिले.

(हेही वाचा – New Year 2024 : या वर्षी आपले अर्थविषयक जग कसे बदलेल?)

जमशेद यांनी सुरुवातील तिला लहानसहान भूमिका दिल्या. देश दीपक आणि नू-ए-यमन या चित्रपटातून तिने भूमिका साकारल्या. पुढे होमी नाडिया यांच्यासोबत काम करताना तिला चांगल्या भूमिका साकारता आल्या. होमी नाडियासोबत तिने लग्नगाठ देखील बांधली. हंटरवाली, मिस फ्रंटियल मॉल, लुटारु ललना, पंजाब मैल, डायमंड क्विन, बंबईवाली, जंगल प्रिन्सेस, मुकाबला, हंटरवाली की बेटी, मौज, अशा काही चित्रपटातून तिने अभिनय केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.