राजभवनातील सरन्यायाधीश लळीत यांचा सत्कार समारंभ तूर्तास स्थगित

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या दुःखद निधनामुळे भारत सरकारने 11 सप्टेंबर, 2022 रोजी संपूर्ण देशभर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार 11 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे, असे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी कळविले आहे. त्यामुळे लळीत यांचा सत्कार समारंभ तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी गुरूवारी रात्री निधन झालं. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून उपचार करण्यात आले, मात्र त्यांना अपयश आल्याने त्यांचे निधन झाले.

(हेही वाचा – ‘त्यांना माझ्यामुळे पुण्य मिळतंय’, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे आणि विरोधकांना टोला)

एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतानेही दुःख व्यक्त केले आहे. भारताने एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. 11 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here