Ferrari Purosangue : फेरारीची पहिली एसयुव्ही गाडी आता भारतात

फेरारीची पहिली चार दरवाजे आणि ४ सीट असलेली ३१० किमी ताशी वेगाने धावणारी ही एसयुव्ही कार आहे. 

252
Ferrari Purosangue : फेरारीची पहिली एसयुव्ही गाडी आता भारतात
  • ऋजुता लुकतुके

स्पोर्ट्स आणि लक्झरी कार उत्पादक कंपनी फेरारी आता स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल अर्थात एसयुव्हीच्या बाजारपेठेत प्रवेश करत आहे. खरंतर स्पोर्ट्स कार म्हटलं की, तिचा ॲरो-डायनॅमिक लुक आणि लो फ्लोअर डिझाईनच डोळ्यासमोर येतं. शिवाय या गाड्या बहुंतांश वेळा कुप म्हणजे दोनच लोक बसू शकतील अशा असतात. तरंच या डिझाईनमुळे गाडीचा वेग वाढण्यास मदत होते. (Ferrari Purosangue)

पण, जगभरातच एसयुव्ही बाजारपेठ विस्तारतेय. आणि लोकांचा कल मोठ्या गाड्यांकडेच आहे. हे बघून फेरारी सारख्या कंपनीला या क्षेत्रात उतरावं असं वाटलं आहे. आणि त्यांनी पहिली एसयुव्ही बनवली आहे ती फेरारी पुरोसांग्वे… हा इटालियन शब्द आहे आणि यातील पुरो म्हणजे शुद्ध. म्हणजे फेरारीच्या पारंपरिक दोन दरवाजे आणि दोनच जण बसू शकतील अशा स्पोर्ट्स गाड्यांच्या तुलनेत ही गाडी वेगळी असली तरी तिचा आत्मा आधीइतकाच शुद्ध आहे असंच बहुतेक फेरारीला सांगायचं असावं. (Ferrari Purosangue)

कारण, खरंच वेगात फेरारीने कुठलीही कसर सोडलेली नाही. व्ही१२ इंजिन असलेली ही गाडी ताशी ३१० किमीचा वेग सहज गाठू शकते. विशेष म्हणजे ही गाडी आता भारतातही लाँच होतेय. लँबॉर्गिनी, पोर्श, बेन्टली अशा लक्झरी कार उत्पादक कंपन्यांनी यापूर्वीच आपली एसयुव्ही मॉडेल लाँच केली आहेत. आता या फेरारीची भर पडतेय. (Ferrari Purosangue)

(हेही वाचा – Congress देखील फुटीच्या वाटेवर? पक्षाच्या बैठकीला कोण कोणत्या आमदारांनी मारली दांडी…)

फेरारीची ही गाडी खरेदी करण्यासाठी येणार एवढा खर्च 

फेरारी पुरोसांग्वेमध्ये ६.५ लीटर पेट्रोलचं व्ही१२ इंजिन आहे. आणि तेच या गाडीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण, या इंजिनमधून ७२५ बीएसपी इतक्या ताकदीची निर्मिती होते. या ताकदीमुळेच ० ते १०० किमीचा वेग ही गाडी ३.३ सेकंदांत गाठू शकते. बाकी या गाडीचं इंटिरिअर इतर फेरारी गाड्यांप्रमाणेच आहे. आणि तुम्हाला पूर्ण काचेचं छतही मागणीप्रमाणे मिळू शकणार आहे. (Ferrari Purosangue)

गाडीची बूट स्पेस ३७३ लीटर इतकी प्रशस्त आहे. आणि गाडीचा मागचा दरवाजा उजव्या बाजूने उघडणारा आहे. गाडीत १०.२५ इंचांचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. पण, गाडीचं एअरो डायनॅमिक डिझाईन आणि फेरारीचा लुक इथेच सगळं लक्ष जातं. फेरारीची ही गाडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला ६ कोटी रुपये खर्च करावे लागतील एवढं लक्षात असूद्या. (Ferrari Purosangue)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.