मार्च 1995 मध्ये पोर्टलंड युनायटेड या युकेमधल्या फुटबाॅल क्लबच्या स्टेडियमवर काही लोक काम करत होते. या क्लबने नुकतेच दुस-या ठिकाणी आपले बस्तान हलवले होते, पण या ग्राऊंडवर त्याआधी कित्येक वर्ष प्रॅक्टिस केली होती, तसेच मॅचेस खेळण्यात आल्या होत्या.
पोर्टलंड युनायटेडच्या मॅनेजमेंटने हे ग्राऊंड एका खाणकंपनीला विकून टाकले होते. या खाणकंपनीला तिथून दगडमाती काढायची होती आणि त्याचेच काम 22 मार्च 1995 च्या दुपारी चालले होते. त्यावेळी एका कामगाराला खाली खोदलेल्या खड्ड्यात काहीतरी वेगळे दिसले. जवळ जाऊन पाहिले तर तो चक्क 500 किलोपेक्षाही अधिक वजनाचा जर्मन बाॅम्ब होता. हा बाॅम्ब जवळपास 50 वर्षे पोर्टलंड युनायटेडच्या स्टेडियमखाली गाडला गेला होता. त्यामुळे जर एखाद्या कंपाने हा बाॅम्ब फुटला असता, तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
( हेही वाचा: ISRO हेरगिरी प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाकडून केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती )
दुस-या महायुद्धात जर्मनीने टाकला होता बाॅम्ब
दुस-या महायुद्धात नाझी जर्मनीने ब्रिटनवर लाखो बाॅम्ब टाकले होते, त्यातले अनेक बाॅम्ब फुटले नाहीत आणि काळाच्या ओघात ते जमिनीखाली गाडले गेले.
त्या दिवशी नेमके काय घडले ?
त्या दिवशी दगड माती काढण्याचे काम सुरु असताना, पोर्टलंड युनायटेडच्या स्टेडियममध्ये एक महाकाय बाॅम्ब सापडला आणि सगळीकडे एकच घबराट पसरली. हा बाॅम्ब सापडल्यानंतर तो डिफ्यूज करण्यात आला. आसपासचा भाग निवासी होता. शाळा, काॅलेज, हाॅस्पिटल, ऑफिस, खेळायची ग्राऊंड्स असे सगळे इथे होते. त्यामुळे हा बाॅम्ब डिफ्यूज करणे आव्हानात्मक होते.
Join Our WhatsApp Community