स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या कविता संग्रहाची पाचवी आवृत्ती लवकरच

138

स्वातंत्र्य शाहीर कवी गोविंद यांच्या कविता संग्रहाची पाचवी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. यासह त्यांच्या चरित्राचे, त्यांच्या काव्याच्या समीक्षेचे, वैशिष्ट्य विवेचनाचे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने येत्या २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प्रकाशित करण्यात येणार आहे.

पुस्तकाचे मूल्य २५० रुपये असणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये हे प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक सुमारे ४०० पृष्ठांचे असून पुस्तकाची किंमत ४०० रुपये इतकी असणार आहे. प्रकाशनपूर्व नोंदणी (शनिवार, दि. २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत) केल्यास पुस्तकाचे मूल्य २५० रुपये इतके असेल तर हाताळणी आणि पाठवणी यासाठी अतिरिक्त मूल्य राहील.

या ठिकाणी साधा संपर्क

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९२२००७०३८६ किंवा लँडलाईन (०२२) २४४६५८७७ येथे संपर्क साधावा. ईमेल- [email protected] येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सोबत माहितीपत्र जोडले आहे, ते पाहावे.

prakashan

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.