नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर दोन महिलांध्ये तुफान राडा, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

नाशिकमधील पिंपळगाव टोलनाका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण या टोलनाक्यावर दोन महिलांमध्ये आपापसात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर बुधवारी संध्याकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून दोन महिला आपापसात भिडल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – माझ्या ‘त्या’ फोटोसोबत छेडछाड, Nude Photoshoot बाबत रणवीरचा मोठा खुलासा)

टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ पोलीस पत्नी यांच्यात टोल भरण्यावरून किरकोळ वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या मध्यस्थी व माफिनाम्यानंतर हा वाद संपला. निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपल्या पत्नी व दोन मुलांसोबत पुणे येथे जात होते. त्यांनी बुधवारी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आपले शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरावाच लागेल हे कार्ड चालणार नाही, असे सांगितले. त्यानंतर हा वाद झाला.

बघा व्हिडिओ

दरम्यान, ही घटना घडत असताना बघ्यांची गर्दी जमा झाली होती. या दोन्ही महिलांमधील राडा सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र या दोघींनी एकमेकींचे केस इतके घट्ट पकडून ठेवले होते की, दोघींनाही अवरता येत नव्हते. शेवटी दोघा तिघांनी मिळून या महिलांना बाजूला केले. यावेळी त्या एकमेकांना शिवीगाळ करत होत्या. याच हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here