येरवडा कारागृहात तुफान राडा! कैद्यांच्या दोन गटात दगडफेक, हवालदारालाही मारहाण

157

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. यावेळी या कैद्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली. यावेळी दगडफेक सुरू असताना दगडफेक रोखण्याचा प्रयत्न कारागृह पोलीस हवालदारालाही मारहाण केल्याची माहिती मिळतेय.

काय घडला प्रकार

पुण्यातील येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बॅरिक नंबर २७ ते ३१ या बॅरिक जवळ तुफान दगडफेक झाली आहे. त्यामुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. येरवडा कारागृहात जुने कैदी आणि नवीन कैदी एकमेकांसमोर आले. या दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यावेळी दोन्ही कैद्यांच्या गटात सुरू असलेल्या राड्यात मध्यस्थी करणाऱ्या हवालदारालाही कैद्यांच्या जमावाने मारहाण केली. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – …तर पवार,सुळे,ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू, शिंदे गटाचा इशारा)

येरवडा कारागृहातील क्षमतेपेक्षा हजारो कैदी या कारागृहात वास्तव्यास आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला सुद्धा यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात असल्याचे पुन्हा समोर आले आहे. कारागृहात दगडफेक करत राडा घातल्या प्रकरणी न्यायालयीन बंदी समीर शकील शेख, बंदी निलेश श्रीकांत गायकवाड, बंदी पुरुषोत्तम राजेंद्र वीर आणि बंदी देवा साहेब जाधव कारागृहातील कैद्यांवर येरवडा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.