रस्त्यांवरील खड्डे आरएमसीद्वारे बुजवा

110

मुंबईच्या रस्त्यांवरील पडलेले खड्डे कोल्डमिक्स द्वारे बुजवण्यात येत असले तरी ते पुन्हा पावसात वाहून जाते. रस्त्यांवरील खड्डे कायमस्वरूपी बुजले जावे आणि रस्ता टिकाऊ बनला जावा याकरता हे खड्डे बुजवताना जिथे शक्य आहे तिथे आरएमसी वापरून खड्डे बुजवावे अशी सूचना भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरून हे खड्डे कायमस्वरूपी बुजवले जातील, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

( हेही वाचा : महिला आमदारांना वेश्या म्हणणे हीच का शिवसेनेची संस्कृती; आमदार मनीषा चौधरी यांचा हल्लाबोल )

सर्व खड्डे येत्या दोन ते तीन दिवसात बुजवण्याचे नियोजन

विलेपार्ले अंधेरी पूर्व येथील प्रभाग ८४ मधील वीर बाजीप्रभू देशपांडे रोड, तेजपाल स्कीम रोड नंबर २ ,पांडलोस्कर मार्ग, हनुमान क्रॉस रोड नंबर २, परांजपे ए स्कीम परांजपे, बी स्कीम ,जीवा महाले रोड येथील पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज नगर, ना.सी फडके मार्ग आदी ठिकाणी पडलेल्या खड्डयांची माहिती भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी मंगळवारी दुपारी के-पूर्व विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू तसेच परिमंडळ ३चे सहआयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून दिली. याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले. हे सर्व खड्डे येत्या दोन ते तीन दिवसात (पावसाची उघडीप मिळाल्यानंतर) बुजवण्याचे नियोजन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.