वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट! महेश मांजरेकर दिग्दर्शन करणार!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त या सिनेमाची घोषणा करण्यात आली.

163

थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. वीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त या सिनेमाची घोषणा करण्यात आली. दिग्दर्शनाबरोबरच महेश मांजरेकर ऋषि विरमणी यांच्यासह सिनेमाच्या कथेचे लेखन देखील करणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवन संघर्ष नेहमीच मला प्रभावित करत आला आहे. माझे असे स्पष्ट मत आहे कि, वीर सावरकर यांन देशाच्या इतिहासात जे स्थान मिळायला हवे होते, ते मिळाले नाही. या सिनेमाच्या माध्यमातून वीर सावरकर यांनी या देशासाठी दिलेले योगदान मांडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे.
– महेश मांजरेकर, दिग्दर्शक

29854ed9 f1ba 45e1 b811 41c256e51728

(हेही वाचा : माझी जन्मठेप मधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजही प्रेरणादायक)

वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने चित्रपटाची घोषणा!  

निर्माते संदीप सिंह आणि अमित वाधवानी हे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सिनेमाचे संगीत हितेश मोदक आणि श्रेयस पुराणिक करतील. महत्त्वाचे म्हणजे सिनेमाचे चित्रीकरण लंडन, अंदमान आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर वीर सावरकर प्रेमी बरेच उत्सुक झाले असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

वीर सावरकर यांचे जीवन हे खूप संघर्षमय आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच मला प्रोत्साहित करते. या देशाच्या तरुणांना वीर सावरकरांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. या सिनेमाचा भाग होण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.
– अमित वाधवानी, सिनेमाचे निर्माते

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.