कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर!

149

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत निवडणुकांच्या तारखा जाहीर करा असे निर्देश दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या राजपत्रात पालिकेच्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेसह अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून एकूण १३३ सदस्यांसाठी ४४ प्रभांगात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

( हेही वाचा : मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर )

अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर

सन २०११ च्या जनगणनेनुसार १५ लाख १८ हजार ७६२ इतक्या लोकसंख्येसाठी १३३ सदस्यांसाठी निवडणूक होणार असून यासाठी एकूण ४४ बहुसदस्यांच्या प्रभागाची रचना करण्यात आली आहे . या पैकी ४३ प्रभागात ३ सदस्य तर एका प्रभागात ४ सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे . सन २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या ही १ लाख ५० हजार १७१ इतकी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२ हजार ५८४ इतकी आहे. या संख्येचा विचार करता अनुसूचित जाती साठी १३ जागा राखीव रहाणार असून या मध्ये ७ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. तसेच अनुसूचित जमातीसाठी ४ जागा राखीव असून त्या मध्ये २ जागा महिलांसाठी राखीव असतील. सर्वसाधारण महिलांसाठी ५८ जागा राखीव तर उर्वरित ५ ८ जागा या सर्वसाधारण आहेत.

New Project 30

दिनांक १३ मे २०२२ रोजी जाहीर करण्यात आलेली अंतिम प्रभाग रचनेची माहिती ही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर, मुख्यालय कार्यालयात तसेच पालिकेच्या संकेत स्थळावर नागरीकांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी नागरिकांकडून आलेल्या एकूण ९९७ हरकतीं पैकी ३७५ हरकतींचा स्विकार करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप देताना प्रभाग क्र २८,२९,३२,३७,३८,४२ व ४३ या प्रभागांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आल्याचेही महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.