Income Tax: आनंदाची बातमी! आता ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही कर?

140

तुम्हीही टॅक्स (Income Tax) भरत असाल किंवा टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकार यावेळी टॅक्स स्लॅबमध्ये कोणते बदल करणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून यावेळी टॅक्सबाबत सरकारची काय योजना असणार आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कर मर्यादा वाढणार

सध्या 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही, मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच या बदलानंतर जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. यापूर्वी 2014 मध्ये शेवटच्या आयकर मर्यादेत बदल करण्यात आला होता. त्यावेळी ही मर्यादा 2 लाख होती, ती वाढवून 2.5 लाख करण्यात आली होती. त्यामुळे यंदा अशी अपेक्षा आहे की, सरकार वैयक्तिक करातील सूट मिळण्याच्या मर्यादा वाढविण्याचा विचार करत आहे.

(हेही वाचा – निवृत्त MSRTC कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यासंदर्भातील आदेशाला स्थगिती, न्यायालयानं म्हटले…)

मोदी सरकार 2023 मध्ये आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या सुमारे 13 महिन्यांनंतर सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने यावेळी सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करसंबंधित सूचना मागवल्या होत्या, नवीन कर प्रणालीमध्ये सुधारणांना किती वाव आहे, याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे सरकार नव्या आणि जुन्या दोन्ही करप्रणालीत बदल करू शकण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार FREE नाश्ता-जेवण!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.