अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची तब्येत बिघडली; एम्स रुग्णालयात दाखल

150

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सीतारामण यांना सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. त्यांना दुपारी 12 वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

निर्मला सीतारामण खासगी वाॅर्डमध्ये दाखल 

PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तत्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना एम्समधील खासगी वाॅर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा: व्हीडिओकाॅनचे मालक वेणूगोपाल धूत यांना CBI कडून अटक; ICICI बॅंक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.