लोकाभिमुख, विकासाभिमुख व पर्यावरणपुरक असा महापालिकेचा अर्थसंकल्प : महापौर

88

महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थायी समितीला सादर केलेला ४५ हजार ९४९. २१ कोटींचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख, विकासाभिमुख व पर्यावरणपुरक असून या अर्थसंकल्पात मुंबईतील पायाभूत सुविधा तसेच अनेक विकास प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक तरतूद केली असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

मुंबईतून सर्वात जास्त महसूल केंद्र सरकारला मिळत असल्यानंतरही केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात मुंबईच्या तोंडाला पाने पुसली. परंतु मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मागील वर्षी ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या महत्वाच्या ३१ प्रकल्पांसाठी १७,९४२ कोटींची भरीव तरतूद केली आहे. मुंबईत जन्मलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सर्वसामान्य मुंबईकरांच्या विकासाचा असलेला ध्यास या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

सेनेच्या सर्व आश्वासनांची पूर्तता-स्थायी समिती अध्यक्ष

मुंबईचा महापालिकेचा अर्थसंकल्प हा आरोग्यदायी, पर्यावरण पुरक तसेच मुंबईच्या विकासाला गती देणारा असा आहे. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने जे जे म्हणून आश्वासन दिले होते, त्या सर्व आश्वासनांपैंकी राहिलेल्या आश्वासनांची पूर्तता या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात येत आहे. मुंबईचा विकास करताना विरोधक काय बोलतात यापेक्षा आपल्याला काय करायचे आहे याची शिकवण आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आणि शिवसेना पक्षाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री यांच्याकडूनही आम्हाला तीच शिकवण मिळत आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासाला आणि मुंबईकरांचे आरोग्यदायी जीवन बनवण्याचा संकल्प या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आल्याची प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

(हेही वाचा – लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार!)

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना घराशेजारीच प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणारा उपक्रम असो वा योगाद्वारे चांगले आरोग्य देण्यासाठी शिव योग केंद्र असो वा कर्करोगावरील उपचार प्रणाली असलेली प्रोटॉन थेरपी सुरु करण्याबाबत आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. शिवसेनेच्यावतीने मागणी केलेल्या या तिन्हींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. प्रोटॉन थेरपीसाठी सध्या १५ ते १८ लाख रुपयांचा खर्च येतो, त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सुरु केल्यानंतर रुग्णांना अवघ्या पावणे दोन लाखांमध्ये हा उपचार मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी खर्च केलेली रक्कम पुन्हा महापालिकेला प्राप्त होणार असून प्रोटॉनच्या माध्यमातून महापालिकेच्या डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यामुळे भावी तरुण पिढीच्या शिक्षणासाठी पावणे चारशे कोटींची केलेली तरतूद असो भावी पिढीच्या आरोग्याच्या विचार करतही योजना तथा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. पर्यावरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष आजवर विकासकामे करत मुंबईकरांची सेवा करत आली आहे. ही सेवा करण्यासाठीच मुंबईकरांनी शिवसेनेला वारंवार मुंबई महापलिकेत पाठवले आहे आणि पुढेही ही सेवा करण्यासाठी पाठवतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.