वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत राज्याचा देशात कितवा क्रमांक जाणून घ्या…

राज्यात कोरोना रुग्णसंख्या आठवड्याभरात वेगाने वाढली. राज्यात सध्या सात हजारांच्या घरात असलेल्या कोरोना रुग्णांवर विविध भागांत उपचार दिले जात आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसारच महाराष्ट्र राज्याने वाढत्या कोरोना संख्येच्या आकडेवारीत देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळवला आहे. मात्र राज्यात येत्या काही दिवसांत कोरोनाची संख्या वाढतच राहील, असे राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले.

( हेही वाचा : राज्यात ओमायक्रॉन पसरतोय की दुसरा विषाणू ? जाणून घ्या…)

केरळ पहिल्या स्थानी 

देशात केरळ कोरोनाच्या वाढत्या संख्येत पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात दशलक्ष लोकसंख्येमागे ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. केरळात मात्र परिस्थिती फारच भयावह आहे. केरळात दशलक्ष लोकसंख्येमागे २६४ कोरोना रुग्ण आढळून आले. आठवड्याभरात राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसून येत असल्याने आरोग्य विभागातील अधिका-यांनी चिंता व्यक्त केली.

४ जूनच्या आकडेवारीप्रमाणे, राज्यात २५४ कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करावे लागले. ६१ रुग्ण गंभीर आढळले असून अतिदक्षता विभागात ४६ रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर तर ४३ रुग्णांना ऑक्सिजनची मदत लागली. अतिदक्षता विभागात नसलेल्या १५ रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज भासल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिका-यांनी दिली.

राज्यात येत्या दिवसांत कोरोनाची संख्या वाढत राहील. नागरिकांनी सतर्कता म्हणून शरीरात ताप असला तर कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.
डॉ प्रदीप व्यास, प्रधान मुख्य सचिव, आरोग्य विभाग

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here