Alert! तुमच्या वाहनाचं PUC आहे का? नसेल तर…

तुम्ही मुंबई सारख्या गर्दीच्या शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे मोटारसायकल, कार किंवा स्कूटर कोणतेही वाहन असेल आणि तुम्ही यापैकी कोणत्याही वाहनाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता मोटारसायकल, कार किंवा स्कूटर चालकांकडे वैध पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUC Certificate) नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

PUC आहे का? नसेल तर…

त्यामुळे ज्या वाहन चालकांकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार प्रत्येक मोटार वाहन जे बीएस १, बीएस २, बीएस ३ आणि बीएस ४ इंजीनवर चालतं त्या प्रत्येक वाहनधारकाकडे पीयूसी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

(हेही वाचा – संसद संवादाचे सक्षम माध्यम, जिथे वादविवाद, विश्लेषण, चर्चा होणे आवश्यक – पंतप्रधान मोदी)

काय होणार शिक्षा ?

यासंदर्भात परिवहन विभागाने असे सांगितले की, वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकास ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास अथवा १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, किंवा या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतील. त्याचबरोबर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही ३ महिन्यांसाठी रद्द केले जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या वाहनाचं PUC तुम्ही केलं नसेल किंवा तुमच्याकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर ते काढून घ्या, अन्यथा १० हजार रुपयांचा दंड तुम्हाला बसू शकतो.

पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे काय?

  1. वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांसाठी पीयूसी सर्टिफिकेट काढले जाते.
  2. प्रदूषण होण्याची शक्यता जास्त असलेल्या मोठ्या शहरांमध्ये वाहनांसाठी पीयूसी सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे.
  3. हे प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतंही वाहन किती प्रदूषण करते, याची तपासणी केली जाते. त्यानुसार वाहनांची तपासणी करून पीयूसी सर्टिफिकेट देण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here