फिनोलेक्स केबल्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिकल व कम्युनिकेशन केबल्स उत्पादक कंपनीने, वेगवेगळ्या ग्राहक प्रवर्गांसाठी तयार केलेल्या क्रीझ फ्री आयर्न (इस्त्री) रेंजच्या माध्यमातून, छोट्या घरगुती उपकरणांच्या बाजारपेठेत प्रवेश केल्याची घोषणा गुरुवारी केली. यासह फिनोलेक्स केबल्स आपल्या भक्कम रिटेल विक्रेत्यांच्या जाळ्यात या नवीन उत्पादनाचा विस्तार करत आहे.
आपल्या ग्राहकांना परवडण्याजोग्या पण टिकाऊ उत्पादने पुरवण्याच्या आपल्या उद्दिष्टाशी सुसंगती राखत, कंपनीची अत्याधुनिक स्टीम अँड ड्राय आयर्न्स वापरासाठी सुलभ ठरेल अशा रितीने डिझाइन करण्यात आली आहे. ग्राहकांना तणावमुक्त पद्धतीने वापरता येतील अशी उत्पादने देऊन ग्राहककेंद्री कंपनी होण्याच्या फिनोलेक्स केबल्सच्या धोरणाशीही हे उत्पादन सुसंगत आहे.
फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया यावेळी म्हणाले, फिनोलेक्स केबल्स ही वायर्स व केबल्सच्या क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे आणि ग्राहकांना संपूर्ण इलेक्ट्रिकल उत्पादने पुरवण्यास कंपनी उत्सुक आहे. छोटी घरगुती उपकरणे हा वर्ग आम्ही वाढीची संधी म्हणून निश्चित केला आहे. ग्राहकांना सोयीस्कर विना कटकट आयुष्य जगण्यात मदत करतील अशी उत्पादने देण्याचे तसेच आमचा ब्रॅण्ड ज्या कशाचे प्रतिनिधित्व करतो त्याचा थेट अनुभव घेण्याची संधी देऊन आमच्या ब्रॅण्डची अनन्यसाधारणरित्या ओळख करून देण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे.”
फिनोलेक्सने इलेक्ट्रिक वॉटर हीटर्स, पंखे, एमसीबी, स्विचेस व प्रकाशयोजनेशी निगडित उत्पादने आणून यापूर्वी इलेक्ट्रिकल विभागात प्रवेश केला आहे. या उत्पादनांना ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आधुनिक, सुसज्ज कारखाने उभारण्याच्यादृष्टीने उत्तमरित्या विकसित केलेली धोरणे व बाजारपेठेच्या आवश्यकतांनुसार नियमितपणे क्षमतेचा विस्तार करणे याचे फलीत म्हणून कंपनीने जलद व उद्योगक्षेत्रातील सर्वाधिक वाढ साध्य केली आहे.
( हेही वाचा: Amazon Layoff: अॅमेझाॅन कंपनी करणार 18 हजार कर्मचा-यांची कपात )
मार्केटिंग व विक्री विभागाचे अध्यक्ष अमित माथूर म्हणाले, आयर्न्स हा स्पर्धात्मक प्रवर्ग असल्याचे आमच्या लक्षात आले आणि म्हणूनच आम्ही आकर्षक डिझाइन्स, रंग व प्रगत सुविधांनी युक्त असे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ व संसाधनांची गुंतवणूक केली आहे. ‘क्रीझ फ्री स्ट्रेस फ्री’ अशा विधानासह आणलेल्या या आयर्न्स आमच्या ‘नो स्ट्रेस, फिनोलेक्स’ अभियानाचा पुनरुच्चार करतात. हे अभियान सध्या टीव्ही वाहिन्या, डिजिटल व ओओएच माध्यमांवरून राबवले जात आहे. या प्रवर्गासाठी वितरण ही गुरुकिल्ली असल्याने प्रारंभिक टप्प्यासाठी आम्ही पूर्वीपासून अस्तित्वात असलेले 200 वितरक निश्चित केले आहे. हे वितरक आमच्या उत्पादनाचा साठा ठेवण्यास उत्सुक आहेत. या सहयोगींच्या माध्यमातून आमच्या आयर्न्स 25,000 हून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध होतील असे आम्हाला अपेक्षित आहे. येत्या काही वर्षांत हे उत्पादन देशभरातील 100,000 हून अधिक दुकानांमध्ये वितरित करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे.”
फिनोलेक्स केबल्स ही भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिकल व टेलीकम्युनिकेशन्स केबल कंपन्यांमधील एक आहे. वायर्स व केबल्स उत्पादक कंपनी ते इलेक्ट्रिकल उत्पादनांची कंपनी असा प्रवास ही कंपनी जलद गतीने करत आहे. लाइट्स, वॉटर हीटर्स, पंखे, स्विच गीअर व इलेक्ट्रिकल वाहक आदी उत्पादने बाजारात आणण्यासाठी आपल्या उत्पादन श्रेणीचा विस्तार करून कंपनी हे साध्य करत आहे. यातून आधुनिक घरांच्या गरजा पूर्ण करणारी नवोन्मेषकारी उत्पादने पुरवण्याचा कंपनीचा लौकिक अधिक सशक्त होत आहे.
कंपनीने वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या पीव्हीसी इन्सुलेटेड इलेक्ट्रिकल केबल्सच्या उत्पादनापासून आपले काम सुरू केले होते. वायर्स व केबल्सच्या विस्तृत वैविध्यासह कंपनी लायटिंग उत्पादने, इलेक्ट्रिकल वायरिंग अक्सेसरीज, स्विजगीअर, पंखे आणि वॉटर हीटर्स यांचेही उत्पादन करते. कंपनीचे उत्पादन कारखाने पुण्यात पिंपरी व उर्से येथे आहेत. तसेच गोवा व उत्तराखंड येथेही उत्पादन कारखाने आहेत. ग्राहकांच्या गरजा, दर्जा व पर्यावरणविषयक आवश्यकतांना प्राधान्य देतानाच, फिनोलेक्स केबल्स, नवोन्मेषकारी तंत्रज्ञाने आणण्यासाठी आणि तांत्रिक प्रावीण्य सुधारण्यासाठी सातत्याने काम करत असते.