हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. भाजप, शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांपैकी कोणाचं हिंदुत्व श्रेष्ठ यावरून चढाओढ होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी बाबरीच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका केली. त्यानंतर पुन्हा एकदा बाबरीचा मुद्दा चर्चेत आला. जेव्हा बाबरी ढाचा पाडला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कार सेवकांसह या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
6 डिसेंबर 1992 ला जेव्हा बाबरी ढाचा पाडण्यात आला, त्या दिवशी अयोध्येतील रामजन्मभूमी पोलिस स्थानकात केस नंबर 197/1992 आणि केस नंबर 198/1992 असे दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते.
(हेही वाचाः तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणणार, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा)
केस नंबर 197/1992
यामध्ये रामजन्मभूमी पोलिस स्थानकाचे अधिकारी पी.एन. शुक्ला यांनी 5.15 च्या सुमारास लाखो कार सेवकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. दुपारी 12 त 12.30 दरम्यान गुन्हा घडल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
केस नंबर 198/1992
तर बरोबर 10 मिनिटांनि दाखल झालेल्या या एफआयआरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंघल, विनय कटियार,गिरीराज किशोर, विष्णू हरी दालमिया, उमा भारती आणि साध्वी रितांबरा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यांनी प्रक्षोभक भाषणे करुन बाबरी पाडण्यासाठी कारसेवकांना उद्युक्त केले, असा आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
(हेही वाचाः वाघाचे फोटो काढून कुणी वाघ होत नसतं, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना चिमटा)
Join Our WhatsApp Community