परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या… अकोल्यात गुन्हा दाखल

अकोल्यात गुन्हा दाखल करुन, तो तपासासाठी ठाणे येथे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.

अकोल्यातील पोलिस अधिकारी बी आर घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्या सह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायदा (जातीवाचक)भ्रष्ट्राचार इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत आरोप?

अकोल्यातल्या कोतवाली पोलिस ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी पराग मणेरे आणि आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अकोल्यात गुन्हा दाखल करुन, तो तपासासाठी ठाणे येथे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. घाडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महसंचालकांना एक पत्र लिहिले होते. त्यात तायंनी ठाण्याचे आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, असा गंभीर आरोप घाडगे यांनी पत्रात केला होता. आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी परमबीर सिंग यांना मदत करत होते, असंही त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

रश्मी शुक्ला यांचा नोदवला जबाब

सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला. हैद्राबादमध्येच जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सीबीआयकडून सध्या 100 कोटी वसुली प्रकरणाचा तपास सुरू आहे, ज्यामध्ये अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप केला होता, असा आरोप त्यांच्यावर आहे. रश्मी शुक्ला यांनी याच बदल्यांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपावरुन फोन टॅपिंग करत, एक अहवाल बनवला होता. जो गोपनिय होता त्या अनुषंगाने त्यांचा जबाब नोंदवला गेल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः प्रश्न पाठवा, उत्तरे देईन… रश्मी शुक्ला यांचा चौकशीसाठी हजर राहण्यास नकार! ‘हे’ आहे कारण)

दुसरीकडे हा फोन टॅपिंग प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसात अज्ञातविरोधात गुन्हा दाखल करुन, तपासला सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्या कोरोनाचे कारण देत चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here