पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली. एका इमारतीत हे हॉटेल ७ व्या मजल्यावर हे हाॅटेल आहे. आग इतकी भीषण आहे की त्यामुळे टेरेसचेही मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुण्यातील लुल्लानगर परिसरात हॉटेलला भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत@CMOMaharashtra @DGPMaharashtra @CPPuneCity #Maharashtra #pune #firebreak #lullanagararea pic.twitter.com/wTtOPQIbPW
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 1, 2022
कोणतीही जीवितहानी झालेली नाही
कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना आहे. मंगळवारी सकाळीच या इमारतीच्या वरच्या भागातील मजल्यांवरून आधी धूर निघाल्याचे प्रत्यक्ष दर्शींना दिसले. त्यानंतर याच ठिकाणाहून मोठ-मोठे आगीचे लोळ उठताना दिसले. आग पसरू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आग लागलेल्या इमारतीत अनेक दुकाने, ऑफिस, आणि सोन्याची दुकाने आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हॉटेलच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आग भीषण असल्यामुळे हॉटेलच्या आत प्रवेश करताना अडथळे निर्माण होत आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
( हेही वाचा: मोरबी पीडितांना सर्वतोपरी मदत करावी: पंतप्रधान नरेंद्र मोदी )
Join Our WhatsApp Community