खेड येथील घरडा केमिकल प्लॅंटला भीषण आग!

अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या घरडा केमिकल प्लॅंटला भीषण आग लागली आहे. या आगीत ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी आणि दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. तसेच जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

स्फोट झाल्याने लागली आग

लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल प्लॅंटमध्ये एकापाठोपाठ एक असे दोन मोठे स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. स्फोट नेमके कशामुळे झाले याचं कारण मात्र अजून कळू शकलेले नाही. अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चार जणांचा मृत्यू, एक गंभीर

स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झालेले असून, जखमींना कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच स्थानिक आमदारांनी सुद्धा तेथील प्रकरणाची माहिती घेतली असून, हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. तसेच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेल्या चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बाळासाहेब रामचंद्र गाढवे(49), आशिष चंद्रकांत गोगावले(40), महेश महादेव कासार(26), गणेश फकीरा मानतकर(40) अशी मृतांची नावे आहेत. तर अभिजीत सुरेश कवाडे(35) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना पनवेल येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारांसाठी हलवण्यात आल्याची माहिती यंत्रणेकडून मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here