नवी मुंबई एमआयडीसीत भीषण आग; चार कंपन्या जळून खाक

नवी मुंबईतील एमआयडीसी  परिसरात भीषण आग लागली आहे. ही आग इतकी मोठी आहे की त्यात चार कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. चार कर्मचारीही या आगीत अडकल्याची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीत अग्नितांडव पाहायला मिळत आहे. सध्या अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आग आटोक्यात आणण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत.

लोकांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु

नवी मुंबईतील ही आग प्रचंड मोठी आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये ही आग लागली आहे. त्या कंपन्यांमध्ये केमिकलचे ड्रम्स मोठ्या प्रमाणात आहेत. काही कामगार या कंपन्यांमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग लागल्यापासून 70 मीटर अंतरापर्यंत आगीचा झळा लागत आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे बचाव पथकासमोर मोठे आव्हान आहे.

( हेही वाचा: मुख्यमंत्री जाणार उच्च न्यायालयात, हे आहे कारण )

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

आतापर्यंत ही आग आठ कंपन्यांमध्ये पसरली आहे. कंपन्यांमध्ये केमिकल ड्रम्स असल्याने आगीचा भडका उडत आहे. या भयानक परिस्थितीला सध्याच्या घडीला नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही आग इतकी भीषण आहे की, अग्निशमन दलाकडून होणा-या पाण्याच्या मा-याचा काहीच फायदा होताना दिसत नाहीये.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here