राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरिस्का जंगलाला भीषण आग लागली आहे. ही आग जवळ जवळ 10 किमी पर्यंत पसरली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच, सिव्हिल डिफेन्सचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासंच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पण सोमवारी पुन्हा दुपारी आग भडकली आणि आता ती डोंगररांगांमध्ये पसरली आहे.
लष्कराचे हेलिकाॅप्टरही मागवण्यात आले
मागच्या 24 तासांपासून भडकलेल्या या आगीत जंगलातील सारे जळून भस्मसात झाले आहे. ही आग एवढी पसरली आहे की, पृथ्वीपुरास बालेटा, भाट्याला, नया आणि प्रतापपूरा गावांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या ही भीषण आग विझवण्यासाठी लष्कराची दोन हेलिकाॅप्टर मागवण्यात आले आहेत.
( हेही वाचा :सर्वसामान्यांना दणका! जाणून घ्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत आठवड्याभरात किती झाली वाढ )
प्राणी घेतायत गावाकडे धाव
सरिस्का डोंगरात लागलेली आग इतकी भीषण आहे की, आगीमुळे प्राणी त्रस्त झाले असून, ते गावाकडे धाव घेत आहेत. खेड्यापाड्यात जनावरांच्या प्रवेशाची घोषणा करत पोलिसांचे पथक लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे. धुरामुळे मधमाश्या इकडे तिकडे उडत आहेत. तसेच, आग विझवणा-या अधिका-यांवर हल्ला करत असल्याने, आग विझवण्यात अडथळा निर्माण होत आहे.