पुण्यातील PMPML बसेसचे होणार फायर ऑडिट!

144

पुण्यातील पीएमपीएमएल बसेसचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. पुण्यात पीएमपीएमएल बसच्या आगीच्या घटना रोखण्यासाठी पीएमपीएमएलने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Online Fraud रोखण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल, मोबाईलमध्ये जपून ठेवा ‘हा’ 4 अंकी नंबर)

पीएमपीएमएल बसेसच्या करण्यात येणाऱ्या या फायर ऑडिटमध्ये बस मधील अग्निशामक सिलिंडर बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच ऑईल लिकेज होत असेल तर त्यासाठी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

यासोबतच चालक-वाहकांना यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुण्यात एकूण 2 हजार 121 पीएमपीएमएल बसेसचे फायर ऑडिट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बसमध्ये आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताफ्यातील सर्व पीएमपीएमएल बसगाड्यांचे फायर ऑडिट तपासण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.