मुंबईतील धारावीत भीषण आग! २५ हून अधिक झोपड्या जळून खाक

मुंबईच्या शाहूनगर परिसरातील कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये २५ पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, पहाटे ४ च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! या खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवे दर)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम सुरू होते. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात समस्या येत आहेत.

आगीमुळे वाहतुकीमध्ये बदल

धारावी कमला नगर येथील आगीमुळे ९० फिट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीने रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून ६० फिट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here