पुण्यात मिसळच्या हॉटेलसह ८ दुकानात भीषण अग्नितांडव

200

पुण्यातील नगररस्त्यावर खराडी जुना जकात नाका येथे रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी मिसळ व बाजूच्या फर्निचर, मोबाईल शॉपीच्या दुकानाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग लागल्याने आत्तापर्यंत आठ दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. यामध्ये हॉटेल जोगेश्वरी मिसळ, दोन मोबाईल शॉप, तीन फार्निचर शॉप, हॉटेल एस कुमार अगीत भस्मसात झाल्याचे सांगितले जात आहे.

आग लागल्याने नगररस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी चार आगीचे बंब दाखल झाले असून ही भीषण आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. बुधवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब उशिरा दाखल झाल्याने आग आवाक्याच्या बाहेर गेली. आग लागल्याने नगररस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचा – औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला ‘या’ राजकीय संघटनांचा तीव्र विरोध)

सुदैवाने कोणीही जखमी नाही

खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोर लागलेल्या आगीमध्ये एकूण 12 विविध प्रकारची दुकाने जळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून कुलिंगचे काम मोठ्या सुरू होते. या घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.