पवईत गाड्यांच्या सर्विस सेंटरमध्ये अग्नितांडव!

मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरूच असून, पवई परिसरातील हुंडाई सर्विस सेंटरला सकाळी ११ वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, तसेच चार टँकर घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. पवई पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित आहेत. ही आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच जीवितहानीबाबत कोणतेही माहिती समोर आलेली नाही.

जीवितहानी नाही

पवईच्या साकी विहार रोडवर सी लँड हॉटेल जवळ, साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला काही वेळा पूर्वी भीषण आग लागली. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात आगीचे लोट मोठ्या प्रमाणात उसळले आहेत. त्यामुळे परिसरात ही आग पसरू नये, याची विशेष काळजी अग्निशमन दलाकडून घेण्यात येत आहे. पण, सुदैवाने अद्याप यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

( हेही वाचा : मुंबई पोलिसांकडून कोल्हापूरमधील ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त)

मदत कार्याला उशीर

या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. या सर्विस सेंटरमधून मोठ मोठ्या स्फोटाचे आवाज होत आहेत. याठिकाणी कोट्यवधी किमतीच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, या सर्विस सेंटरमध्ये काम करणारे कामगारदेखील आत अडकले असण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here