दिल्लीच्या चांदनी चौकात भीषण अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल

109

दिल्लीमधील चांदनी चौकातील लाजपत राय मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग विझवण्यात दलाला यश आले आहे. या भीषण आगीमध्ये 60 हून अधिक दुकाने जळून खाक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अशीही माहिती आहे की, दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील लाजपत राय मार्केटमध्ये पहाटे 4.45 वाजता आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.एएनआय या वृत्तसंस्थेने जळालेल्या दुकानांची छायाचित्रे ट्विट केली आहेत. यामध्ये असे दिसतेय की मार्केटमधील बऱ्याच दुकानांमध्ये ठेवलेला माल जळून खाक झाला आहे.

सुरतमध्ये गॅस गळती, 25 जणांची प्रकृती गंभीर

गुजरातमधील सुरत येथे आज एक मोठी दुर्घटना घडली. येथील विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधील गॅस गळतीमुळे 6 गिरणी कामगारांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्याने कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर 25 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी झालेल्या अपघातामुळे प्रिंटिंग मिलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळील नाल्यात अज्ञात टँकर चालकाने विषारी केमिकल टाकले होते. यादरम्यान विषारी वायूची गळती होऊ लागल्याने जवळच असलेल्या गिरणीतील कामगार विषारी वायूच्या विळख्यात आले.

(हेही वाचा – आयकर विभागाची धाड! उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी छापे)

सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरु केले आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या दुर्घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.