मानखुर्दमधील मंडला परिसरात चार भंगार गोदामांना भीषण आग

मुंबईतील मानखुर्द येथील मंडला परिसरातील चार भंगार गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे आजू-बाजूच्या परिसरात उंचावर धुराचे लोट दिसत आहेत. भंगार गोदामांना लागलेल्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमधील मंडला परिसरात विविध प्रकारची गोडाऊन आहेत. तसेच या परिसरात तेलाची गोडाऊन, साबन बनवण्याचे कारखाने, कागद बनवणे, फर्निचर बनवण्याचे कारखाने देखील परिसरात आहेत.

(हेही वाचा – माथेरान-अमन लॉज शटल सेवा: २ महिन्यांत ५४.५९ लाखांचा महसूल जमा)

असेही सांगितले जात आहे की, मानखुर्द मधील मंडला परिसरात लागलेली ही आग भीषण असून सुदैवाने याठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मुंबई पालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here