दक्षिण नागपुरातील बेलतारोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये कित्येक झोपडपट्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागलेल्या जागेत अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही भीषण आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही आग सिलिंडर ब्लास्ट झाल्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, महाकाली नगर झोपडपट्टीत सोमवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली. ही आग लागल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींची गर्दी झाल्याचे बघायला मिळाले. अनेक घरं, झोपडपट्ट्या देखील या आगीत जळून खाक झाले आहेत.
आग कशामुळे लागली? कारण अस्पष्ट
या झोपडपट्टीत जवळपास १६ वेळा मोठे आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण, आग नेमकी कशामुळे लागली? याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – NIA चा दणका! मलिकांचा साथीदार आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त खंडवाणींची मालमत्ता जप्त)
Join Our WhatsApp Community