बुर्ज खलिफाजवळील ३५ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव

154

दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीजवळील 35 मजली भव्य इमारतीला सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कोणी जखमी झाले की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

(हेही वाचा – पालघरमध्ये दोन MSRTC बसेस समोरासमोर धडकल्या अन्…, २५ जण जखमी)

ही इमारत एमिरेटमधील राज्य-समर्थित डेव्हलपर एमार यांच्या 8 बुलेवर्ड वॉक नावाच्या टॉवर्सच्या सिरीजचा एक भाग आहे. तासाभराच्या प्रयत्नानंतर सोमवारी पहाटे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. इमारतीतून धूर निघत असल्याची माहिती लोकांनी संबंधित विभागांना दिली. मात्र, डेव्हलपर एमार यांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. अलिकडच्या वर्षांत गगनचुंबी इमारतींनी सजलेल्या दुबईतील उंच इमारतींमध्ये लागलेल्या आगीमुळे देशात वापरल्या जाणार्‍या क्लेडिंग आणि इतर सामग्रीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहेत.

2015 मध्येही घडली होती अशी घटना

2015 मध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, बुर्ज खलिफाजवळ दुबईच्या सर्वात महागड्या हॉटेल आणि निवासस्थानांपैकी एक असलेल्या ‘एड्रेस डाउनटाउन’ मध्ये मोठा स्फोट झाला होता. यावेळी देखील अनेक जणांचा जीव धोक्यात आला होता.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.