शाहरुखच्या बंगल्याशेजारील इमारतीला आग

बॉलिवूडचा बादशहा, किंग खान शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याशेजारी असलेल्या उंच टॉवरवरील १४ व्या माळ्याला आग लागली. सोमवारी, ९ मे रोजी ही आग लागली.

आगीची लेव्हल-२

या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तसेच पोलीस आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणाले की, ही आग लेव्हल-२ ची आहे. आग विझवण्यासाठी ८ फायर इंजिन लागले. त्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. यावेळी सात मोठे टँकर्स आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी मुंबई महापालिका आणि अदानी इलेक्ट्रीसिटीचे अधिकारीही उपस्थित होते. जिवेश इमारतीला ही आग आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here