नंदूरबारमध्ये एक्सप्रेसला भीषण आग, धावपळ किंचाळ्या आणि प्रवाशांचा एकच गोंधळ!

116

नंदूरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याने, प्रवाशी प्रचंड घाबरले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ आणि आरडाओरड सुरु झाली. प्रवाशांच्या किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एकच गोंधळ उडाला. आगीने भीषण रुप धारण केले, आगीच्या लोटातून निघणा-या धूराने लोकांना श्वसनालाही त्रास होत होते. नंदूरबार स्टेशन जवळ असल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. मोटारमनने प्रसंगावधान दाखवत एक्सप्रेस थांबवली. तसेच, अश्निशमन दलानेही तत्काळ घटनास्थळी येऊन आग विझवायला सुरुवात केली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही, तसेच आग लागण्याचे कारणही अस्पष्ट आहे.

सुदैवाने जीवितहानी झाली नाही

शनिवारी सकाळी गांधीधाम पुरी एक्सप्रेस नंदूरबार स्थानकात येत असताना, अचानक एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असते. त्या ठिकाणी आगीने पेट घेतला. बघता बघता ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीबरोबर धुराचे लोळही पसरल्याने, प्रवाशी घाबरले त्यामुळे जीव वाचवण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. आगीची माहिती मिळताच मोटरमननेही गाडी थांबवली. त्यामुळे प्रवाशांनी  तत्काळ गाडीतून उड्या मारत स्वत:ची सुटका करून घेतली.

( हेही वाचा: एडीआर अहवाल: भाजप सर्वात श्रीमंत पक्ष, तर काॅंग्रेसचे देणे बाकी आणि जाणून घ्या शिवसेना कुठे ? )

म्हणून आग अधिक वाढली

एक्सप्रेसला आग लागल्यानंतर, ती विझवण्यासाठी रेल्वेकडे कोणतीच साधनं नसल्याने, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांना काहीच करता आले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे दोन्ही डब्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.