नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शालिमार LTT एक्स्प्रेसला भीषण आग

160

नाशिक रोड रेल्वे स्थानकात शालिमार एलटीटी एक्सप्रेसच्या एका बोगीला आग लागल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शालिमार एक्सप्रेस मधील कपड्याच्या बोगीला ही आग लागली आहे. या आगीमुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर धुराचे लोट दिसत आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला असून भितीचे वातावरण आहे. मुंबई शालिमार एक्सप्रेसच्या सामानाच्या बोगीला सकाळी 8.43 वाजता आग लागली. नाशिक अग्निशमन दलाचे बंब रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर पोहोचताच ही आग लागल्याची माहिती मिळतेय.

यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र पार्सल बोगीचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.या घटनेमुळे रेल्वे प्रवासी वाहतूक विस्कळित झाली असून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेन या ओढा, निफाड, लासलगाव व मनमाड स्थानकात थांबून आहे.

(हेही वाचा – तुम्हालाही आलाय का ‘हा’ SMS सावधान?, एनआयसीकडून नागरिकांना आवाहन)

काय घडला प्रकार

नाशिकरोड स्थानकावर मुंबईहून जाणाऱ्या शालिमार एलटीटी एक्स्प्रेसच्या पार्सल व्हॅनला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. शनिवारी सकाळी ८.४५ वाजता रेल्वेच्या इंजिनाशेजारी असलेल्या पार्सल व्हॅनला (कोच) आग लागली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सध्या आग विझवण्यात आली असून पार्सल व्हॅनला इतर डब्यांपासून वेगळे केले जात आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मुंबईतील शालिमार ते लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकादरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या इंजिनाशेजारी असलेल्या पार्सल व्हॅनमध्ये (कोच) सकाळी 8.45 च्या सुमारास आग लागली.

यापूर्वीही लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कुर्ला येथे शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटक असल्याचा संशयास्पद वस्तू सापडल्यानंतर अलार्म वाजला होता. यानंतर रेल्वेच्या तपासासाठी बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले. ही ट्रेन हावडा ते मुंबई दरम्यान धावते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.