मुंबईतील महत्त्वाचा आणि अत्यंत गजबजलेला परिसर असेलल्या फॅशन स्ट्रीट भागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील कपड्यांच्या 8 ते 10 दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहितीमिळताच चर्चगेट इथल्या फॅशन स्ट्रीट भागात 6 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास फॅशन स्ट्रीट भाग परिसरातील कपड्यांच्या काही दुकांनांना आग लागली. एकाला एक लागून दुकानं असल्याने दुकानांतील कपड्यांनी काही क्षणात पेट घेतला. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळेत दाखल झाल्याने या भीषण आगीवर नियंत्रण मिळवणं अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.
(हेही वाचा – ‘या’ व्यक्तीने Twitter ला दिली कमाईची आयडीया; ज्यामुळे झाली एवढी मोठी उलथापालथ!)
Maharashtra | Information about fire in shops at Fashion Street, Mumbai received. Fire tenders sent to the spot. More details awaited: BMC
— ANI (@ANI) November 5, 2022
अत्यंत वर्दळीचा फॅशन स्ट्रीट हा परिसर असल्याने दुपारच्या वेळी ही आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा परिसर तत्काळ निर्मनुष्य करण्यात आला. त्यामुळे आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही आग कशामुळे लागली, या आगीमुळे किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही. ही आग लागल्यामुळे या भागातील रस्ते वाहतूकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले असून जळलेला कपड्यांचा माल बाजूला करण्यात येण्याचे काम सूरू आहे. काही दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून काही क्षणात कपड्यांची राख रांगोळी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community