ठाण्यात तीन मजली इमारतीत भीषण आग्नितांडव, वयोवृद्ध घरात अडकले

ठाण्यातील नौपाडा परिसरातील एका इमारतीला आज, गुरूवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील तलावपाळी परिसरातील धवल छाया या इमारतीत ही आग लागली. यावेळी घरात काही वयोवृद्ध अडकलेले होते. यापैकी एका वयोवृद्ध व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

(हेही वाचा – पुण्यातील ‘या’ 11 मार्गांवर PMPMLची सेवा होणार बंद!)

ठाण्यातील धवल छाया या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, एक मोबाईल व्हॅन या घटनास्थळी दाखल झाल्यात. यावेळी त्यांनी इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील घरात अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. काही वेळाने ही आग नियंत्रणात आली असली तरी परिसरात या आगीच्या धुरांचे लोट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून बाहेर येताना दिसत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक उपस्थित झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here