पुण्यातील कॅम्प परिसरात असणाऱ्या एका अनाथ आश्रमाला सोमवारी मध्यराञी १२.४१ वाजता (दि.२६) आग लागली होती. यामध्ये इमारतीत साधारण १०० लहान मुले अडकून पडली होती. या घटनेची माहिती वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळताच अग्निशमन दलाकडून मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन ही घटनास्थळी रवाना करण्यात आले. यानंतर या सर्व अडकून पडलेल्या अग्निशमन दलाने सुखरुप सुटका केली आहे. तसेच त्यांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.
(हेही वाचा – मेंदूच्या पेशी नष्ट करणारा ‘Brain-Eating Amoeba’ आहे तरी काय? ‘या’ देशात पहिल्या रुग्ण)
आश्रमच्या चार मजली असणाऱ्या इमारतीत तळमजल्यावर आग लागल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. यानंतर या तळमजल्यावर अडकून पडलेल्या सुमारे १०० मुलांना घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाकडून आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवण्यात आले. ही मुलं ६ ते १६ वयोगटातील आहेत. त्यानंतर १० मिनिटांत ही आग नियंत्रणात आली.
या आगीत इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचे आणि इतर काही साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आग मध्यम स्वरुपाची असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community