महालक्ष्मीतील विठ्ठल निवास इमारतीत आग!

141

मुंबईत आग लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महालक्ष्मी येथे जेकब सर्कल जवळील ‘विठ्ठल निवास’ या चार मजली इमारतीला बुधवारी दुपारी १२.१५च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जेकब सर्कल येथील सात रास्त्याजवळ विठ्ठल निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली.

( हेही वाचा : सागरी अभियांत्रिकी उत्कृष्टता केंद्र म्हणून ‘या’ नौदल तळाचा गौरव करण्यात आला! )

कोणतीही जीवित हानी नाही

आग विझवण्यासाठी घटनास्थळी ३ अग्निशमन दलाच्या गाड्या, ३ जम्बो टँकर दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला जवळपास १.१५ च्या सुमारास यश आले आहे. या घटनेने मात्र सातरस्ता परिसरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.