मुंबईतील ताडदेवच्या भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला आग; 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

121

मुंबईच्या ताडदेव परिसरात 20 मजली कमला या इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली असून या घटनेत 15 जण जखमी झाले आहे. तर तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन घटनास्थळी 

मिळालेल्या माहितीनुसार, नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागली. ही आग आज सकाळी साडेसातच्या सुमारास लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीत 15 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमला इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून 7 जंम्बो टॅंकरद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! आता ‘ही’ माणसं होणार लालपरीचे चालक अन् वाहक)

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीतून आतापर्यंत दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.