आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

206

आंध्र प्रदेशमधील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विजयवाडा येथे मैदानावर उभारण्यात आलेल्या फटाका स्टॉलला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. काही क्षणात आगीने भीषण रुप धारण केले.

(हेही वाचा – मनसेच्या राजू पाटील यांचं महायुतीवर मोठं वक्तव्य; म्हणाले, “… तर आम्ही युतीसाठी तयार असू”)

फटाक्याच्या एका दुकानाला आग लागल्यानंतर त्याच्या शेजारील इतरही दुकानांना आग लागली. आगीची दुर्घटना घडल्याने सर्वत्र धांदल उडाली. स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क साधला आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

विजयवाडा येथील गांधी मैदानावरही मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या दिवसात ही फटाक्यांची दुकाने लावली जातात. या दुकानांना आज, रविवारी सकाळी आग लागल्याची दुर्घटना घडली. एका पाठोपाठ एक अशा अनेक दुकानांनी पेट घेतल्याचं दिसून आलं. यानंतर मैदानावरील इतर दुकाने तात्काळ बंद करुन अचानक पेट घेतलेल्या फटाक्यांपासून सावधगिरीने वाचविण्यात आली. तसेच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.