गोरेगाव फिल्मसिटी परिसरात भीषण आग! अग्निशमन दलाच्या तब्बल ८ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी परिसरातमध्ये एका स्टुडिओला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या तब्बल ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

( हेही वाचा : एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादीने सोपवली मोठी जबाबदारी; विधानपरिषदेत गटनेतेपदी नियुक्ती)

गुम है किसी के प्यार में या मालिकेच्या (गोरेगाव फिल्म सिटी) सेटला ४ वाजता भीषण आग लागल्याने जवळपासच्या तेरी मेरी दूरियाँ आणि आजू अशा अनेक सेटला आग लागली आहे. या सेटवर एक हजारांहून अधिक लोक होते. या सेटवर कोणत्याही प्रकारची अग्निसुरक्षा नव्हती. सेटवर आग लागली असताना लहान मुलांचे दृश्य चित्रित केले जात होते.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here