मुंबईत कांजूरमार्गमध्ये भीषण आग! ५ महिला जखमी, धुरामुळे गुदमरला नागरिकांचा श्वास

143

कांजूरमार्गमधील कर्वेनगर येथील म्हाडा कॉलनीतील इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. आगीनंतर घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवण्यात आले, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. या घटनेत आगीच्या धुरामुळे काही नागरिकांचा श्वास गुदमरला. कांजूरमार्ग पूर्व येथे कर्वे नगर या ठिकाणी असलेल्या एमएमआरडीएच्या १५ मजली इमारतीला इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे भिषण आग लागली.

( हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या सभेचे उर्दू भाषेत पोस्टर! “बाळासाहेब असते तर हे सहन नसतं केलं…”, शंभुराज देसाईंची सडकून टीका)

कांजूरमार्ग पूर्व येथील कर्वे नगरमध्ये असलेल्या म्हाडाच्या १४ मजली इमारतीला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग इलेक्ट्रिक वायरिंगपर्यंतच मर्यादित होती. तळमजल्यावरील कॉमन इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि ग्राउंड प्लसवरच्या १४ मजल्यांच्या निवासी इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग मर्यादित होती.

आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. यानंतर नागरिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलाकडून कुलिंगचे काम सुरू करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.