प्रभादेवीत बेस्ट सबस्टेशनला आग; अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

126

प्रभादेवी कामगार नगर १,२,३ जवळ बेस्ट इलेक्ट्रिक सबस्टेशनमध्ये आगली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या आणि ३५ जवान दाखल झाले आहेत. याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चावी नसल्याने अग्निशामक दलाचे कर्मचारी शटर तोडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

( हेही वाचा : Yakub Memon Controversy: दोन वर्षांपासून तक्रारीवर कारवाई नाही, दहशतवादी मेमनला कोणाचे वरदान?)

नागटे बिल्डिंग, सामना प्रेस समोर, कामगार नगर नवीन प्रभादेवी रोड येथे ही आग लागल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार ही आग बेस्ट इलेक्ट्रिक सबस्टेशनच्या ऑइल ट्रान्सफॉर्मरला लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणासही दुखापत झालेली नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.