हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील अंब येथे बुधवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे ४ मुलांचा जिवंत मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. अंबमध्ये बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील नंदा पुरी गावच्या भदेश्वर दास व रमेश दास यांच्या झोपड्यांना भीषण आग लागली या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला.
( हेही वाचा : नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं; काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान )
मृतांमध्ये नीतू (१४), गोलू कुमार (७), शिवकुमार (६) व सोनू कुमार (१७) यांचा समावेश आहे. या घटनेत ३० हजाक रुपयांची रोकडही भस्मसात झाली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. वेळीच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाल्याने आग इतरत्र पसरली नाही. मृत मुलांपैकी तीन सख्खे भाऊ-बहीण असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. दोन झोपडपट्ट्यांमध्ये आगीमुळे ४ लोकांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ऊना प्रादेशिक रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे. अशी माहिती ऊना एसपी अर्जित सेन ठाकूर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community