Firing in Kashmir: काश्मिरात २ ठिकाणी गोळीबार, व्हिलेज डिफेन्स गार्डचा सदस्य जखमी

निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अशा हल्ल्यांमुळे लष्कर, पोलीस आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

151
Firing in Kashmir: काश्मिरात २ ठिकाणी गोळीबार, व्हिलेज डिफेन्स गार्डचा सदस्य जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडमधील पनारा गावात गोळीबार झाला. या गोळीबारात व्हिलेज डिफेन्स गार्ड (VDG)चा एक सदस्य जखमी झाला. व्हीडीजी सदस्य जंगलात गस्त घालत होते. त्यानंतर त्याची काही संशयित लोकांशी गाठ पडली. हे संशयित दहशतवादी असू शकतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्हीडीजीच्या मदतीसाठी पनारा गावात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. (Firing in Kashmir)

दुसऱ्या घटनेत, शनिवारी, (२७ एप्रिल) रात्री अज्ञात हल्लेखोरांनी मीरान साहिब भागातील आम आदमी पक्षाच्या नेत्याच्या मिठाईच्या दुकानावर गोळीबार केला, मात्र या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक मीरण साहिब परिसरात पोहोचले. या घटनेत एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा हात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे खंडणीशी संबंधित प्रकरण होते, त्यामुळे दुकानात गोळीबार झाला होता.

एका मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मिठाईच्या दुकानावर गोळीबार करून पळ काढल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांची शस्त्रे जप्त केली आहेत. मीरान साहिब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Pune Lok Sabha Election 2024: मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुणेकरांनी लढवली शक्कल!)

अब्बू जट नावाच्या सोशल मीडिया हँडलने जबाबदारी घेतली
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अब्बू जट्ट नावाच्या सोशल मीडिया हँडलने मीरान साहिबमधील मिठाईच्या दुकानावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हँडलवर हिंदीत एक पोस्ट लिहिली होती. ती अशी की, मीरण साहिब खजुरिया या मिठाईच्या दुकानाबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी आम्ही घेतो. जर आमच्या मतांकडे दुर्लक्ष केले गेले, तर ते आणखी वाईट होऊ शकते. आम्ही इथे आहोत पण आमचे भाऊ अजूनही बाहेर आहेत. तेव्हा असे समजू नका की, आपण नवीन अध्याय सुरू केला आहे आणि शांततेचे पालन करीत आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढची गोळी हवेत सोडणार नाही.

लष्कर, पोलीस आणि प्रशासनाची चिंता वाढली
निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अशा हल्ल्यांमुळे लष्कर, पोलीस आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. जम्मू-काश्मीरच्या ५ लोकसभा जागांसाठी ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला उधमपूर, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला जम्मू, तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी अनंतनाग, चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी श्रीनगर आणि पाचव्या टप्प्यात २० मे रोजी बारामुल्ला मतदारसंघात मतदान होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.