ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार

121

ठाण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांची रांग)

ठाण्यासारख्या गजबजणाऱ्या आणि नागरिकांसह वाहनांची वर्दळ असणाऱ्या शहरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ४ ते ५ वाजेदरम्यान ही घटना घडली. संपत्तीच्या वादातून दोन गटामध्ये राडा झाला आणि हा गोळीबार करण्यात आला. ज्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला, त्याच्यासोबत आणखी दोघे-तिघे जण होते. जे दिवाळीनिमित्त कंदिल बनवण्याचे काम करत होते. यावेळी तेथे तीन-चार जण आले आणि त्यांनी गोळीबार केला. मात्र गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत तेथील दुकानांमधील सीसीटिव्ही फुटेज तपासत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.