अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर तालिबान्यांनी तिथल्या लोकांचे जगणे कठीण केले आहे. आधी महिलांना बुरख्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी, त्यानंतर रात्री एकट्या महिलेला फिरण्यास मनाई केली. आता तर हद्दच झाली मुलींच्या शिक्षणासोबतच नोक-यांवरही तालिबान्यांनी बंदी आणली आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानी सरकार सत्तेत आले आणि सत्तेत येताच तालिबान्यांनी आपल्या जुन्या कायद्यांची अंमजलबजावणी सुरु केली. सर्व महिला आणि विद्यार्थीनींना टार्गेट केले आहे. महिलांना एकटं फिरण्यावरदेखील तालिबान्यांनी ब्रेक आणला. त्यानंतर महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या संस्थांना बंद केले. सरकारने महाविद्यालयांमध्ये मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आणले. त्याविरोधात देशव्यापी आंदोलनदेखील झाले. परंतु त्याचा फार मोठा फायदा झाला नाही. उलट तालिबान्यांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवणा-यांवर गोळीबार केला.
( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना घरचा आहेर; सीमावादाच्या मागणीबाबत अजित पवारांनी ठाकरे, राऊतांना लगावला टोला )
तालिबानने आतापर्यंत कशा-कशावर बंदी आणली?
- मुलींचे माध्यमिक शिक्षण बंद केले
- महिलांना सरकारी नोक-यांमधून काढले
- महिलांना बुरख्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी
- रात्री एकट्या महिलेला फिरण्यास मनाई
- 160 माध्यमांना बंद करण्यात आले
- 100 पेक्षा जास्त रेडिओ स्टेशन बंद केले
- तालिबानविरोधात रिपोर्टिंग करणा-या पत्रकारांची हत्या
- महिलांना पार्क, जिम आणि स्विमिंग पूल या ठिकाणीही बंदी घातली.