गुन्हे शाखेने शनिवारी, ४ डिसेंबर रोजी परमबीर आणि सचिन वाझे यांच्याविरोधात पहिले दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 36 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एसीपी संजय पाटील यांनी वाझे आणि परमबीर सिंग यांच्याविरोधात जबाब दिला आहे.
आरोपपत्रात वाझेचे खंडणी रॅकेट
एसीपी पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे बार आणि हॉटेल मालक यांच्या मिटिंगवेळी सचिन वाझेने त्यांना सांगितले होते की, 1 नंबर म्हणजे परमबीर हेच आहेत. 1 नंबर म्हणजे परमबीर असा जबाब वाझेबरोबरच एसीपी संजय पाटील यांनीही दिला. गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेच्या हाती 69 ऑडिओ क्लिप्स लागल्या आहेत, ज्या खंडणी प्रकरणाशी संबंधित आहेत. या सर्व ऑडिओ क्लिप्स एका पेनड्राईव्हमध्ये एकत्र करून त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. गुन्हे शाखेने मुंबई पोलिस दलातील आतापर्यंत 7 पोलिस अधिकाऱ्यांचे गोरेगाव खंडणी प्रकरणात जबाब नोंदवले आहेत. अधिकाऱ्यांनी वाझे खंडणी रॅकेट कसे चालवत होता, कोणावर कारवाई करायची, कोणावर नाही, याचे तो कसा इन्स्ट्रेक्शन देत होता हेही सांगितले. मुंबईतल्या बुकींची नावे आणि माहिती वाझेने काही अधिकाऱ्याकडे मागितली होती, त्यापैकी काही बुकीवर कारवाई करू नये, अशा सूचना वाझेने दिल्या होत्या.
(हेही वाचा गांधी-नेहरू यांची पत्रे हाच खरा माफीनामा! रणजित सावरकरांचा घणाघाती हल्ला)
Join Our WhatsApp Community