पेंच टायगर व्याघ्र प्रकल्पात रात्रीची सफारी सुरु पण…

124

ताडोबा व्याघ्र सफारीपाठोपाठ आता १७ मे पासून पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरु झालेल्या नाइट सफारीला पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी केवळ दहा पर्यटकांनीच नाइट सफारीचा आनंद लुटला.

पर्यटकांचा फारसा प्रतिसाद नाही

१६ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने पेंच व्याघ्र प्रकल्पात झालेल्या एक दिवसाच्या वन्यप्राणी गणनेत पेंच व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आढळले. त्यामुळे दुस-या दिवसापासून सुरु होणा-या नाइट सफारीला मिळणा-या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु नागलवाडी भागांत केवळ दहा पर्यटकांनीच दोन वाहने बुक केल्याची माहिती पेंच टायगर व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभु नाथ शुक्ल यांनी दिली. वास्तविक पवनी आणि नागलवाडी या बफर क्षेत्रात प्रत्येकी तीन वाहने नाइट सफारीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. मात्र पवनी क्षेत्रातील सफारीकडे पर्यटकांनी पूर्णपणे पाठ फिरवली.

( हेही वाचा : गडचिरोलीत पकडलेला वाघाचा बछडा आता कायमचा नजरकैदेत? )

रात्री ८ ते १२ वाजेपर्यंतच नाइट सफारी सुरु करण्यात आली आहे. एका बफर झोनमध्ये केवळ पंधरा पर्यटक वाहनांसह जाऊ शकतात. एका वाहनात केवळ पाच पर्यंटकांना मुभा देण्यात आली आहे. सोबत वनरक्षक आणि पर्यटक मार्गदर्शकही असेल, ही अट वनविभागाने लादली आहे. साडेतीन तासांच्या नाइट सफारीसाठी ३ हजार ९०० रुपये शुल्क पेंच टायगर व्याघ्र प्रकल्पाकडून आकारले जातील. हा प्रकल्प स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु केल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.