ठाण्यात झाली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

मुंबईत गेल्या सहा वर्षांपासून हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लागोपाठ सुरु आहेत. मुंबईत पालिका तसेच खासगी रुग्णालयातही हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांना वेग आल्याने गरजू रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले होते. आता ठाण्यातही पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून 39 वर्षांच्या रुग्णाला जीवनदान मिळाले.

( हेही वाचा : मंत्र्यांची दिशाभूल करून परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला दणका )

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी भिकाजी निर्गुण यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. रुग्णाच्या नातेवाईकांनी भिकाजी यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. डॉ. भास्कर शहा आणि डॉ. नितीन बुरकुले यांनी त्यांच्या तपासण्या केल्या. त्याबद्दल बोलताना डॉ. बुरकुले म्हणाले,’ रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा त्याची स्थिती अत्यंत नाजूक होती. हृदयात रक्तपुरवठा सुरळीत होत नसल्याने प्रकृती खालावत चालली होती. आम्ही तातडीने हृदय प्रत्यारोपणाचा निर्णय घेऊन आवश्यक प्रक्रिया सुरू केली. भिकाजी यांच्यावर डॉ. प्रवीण कुलकर्णी आणि डॉ. सौम्य शेखर यांनी २४ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया केली. ‘रुग्णाला वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार आणि व्यायामाचा सल्ला दिला गेला. महिन्याभरातील उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा झाली, रुग्णाला शनिवारी डिस्चार्ज दिला जाईल, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here